August 1, 2025
विकासाचा नाश: जमीन आणि मासेमारीच्या हक्कांसाठी आदिवासी गट कसे संघटित झाले
डिंभे धरणाच्या बांधकामामुळे पुण्यातील आदिवासी समुदायांचे जीवन उध्वस्त झाले. त्यांनी या संकटाचे रूपांतर विकासात कसे केले याची कहाणी इथे वाचा.
बुधाजी दामसे हे महाराष्ट्रातील जुन्नर येथील शाश्वत ट्रस्टचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आहेत . ही संस्था पुणे जिल्ह्यातील आदिवासी, आणि आदिवासी समुदायांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी काम करते. त्यांनी समुदायांना शाश्वत मासेमारी, शेती आणि सौरउर्जेवर आधारित सिंचन तंत्रे विकसित करण्यास मदत केली आहे. समुदाय नेते आणि डिंभे जलाशय श्रमिक आदिवासी मच्छिमार सहकारी सोसायटीचे एक प्रमुख सदस्य म्हणून, ते समतापूर्ण आणि समावेशक मासेमारी आणि जमीन हक्कांसाठी काम करत आहेत, जेणेकरून उपेक्षित समुदायांना विकास प्रक्रियेचा फायदा होईल. २०२४ मध्ये, त्यांना सामाजिक उत्कृष्टतेसाठी SPJIMR माजी विद्यार्थी पुरस्कार मिळाला.