नचिकेत मोर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रशिक्षित आहेत. त्यांचे सध्याचे कार्य मुख्यत्वे राष्ट्रीय आणि प्रादेशिक आरोग्यप्रणालींच्या रचनेवर केंद्रित आहे. ते मेंटल हेल्थ मधील बॅनियन अकादमी ऑफ लीडरशिप मध्ये व्हिजीटिंग शास्त्रज्ञ आहेत आणि आय आय आय टी बंगलोरच्या सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संशोधन फेलो आहेत. भारताच्या आरोग्य प्रणालीची रीइमॅजिनिंगवर काम करणाऱ्या लॅन्सेट सिटिझन्स कमिशनचे नचिकेत हे आयुक्त देखील आहेत.