June 14, 2024
“माझे जीवन नेहमीच पाण्यासाठी संघर्ष करण्यात व्यतीत झाले आहे”
मुंबईतील एका अश्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातील एक दिवस, जो भेदभावपूर्ण धोरणांना तोंड देत सार्वत्रिक पाणीपुरवठ्यासाठी संघर्ष करतो.
प्रवीण बोरकर हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते पाणी हक्क समितीमध्ये सह-संयोजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सामुदायिक संघटन, माहिती संकलन आणि निषेध मोर्चांचा अनुभव आहे. अनेक वर्षे, प्रवीण यांनी मुंबईतील वंचित समुदायांच्या हक्कांसाठी आणि मूलभूत सेवांसाठी संघर्ष केला आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयाची पदवी घेतली आहे.