सलोनी मेघानी या आय. डी. आर. मध्ये संपादकीय सल्लागार आहेत. त्या २५ वर्षांहून अधिक काळ पत्रकार, संपादक आणि लेखिका म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी द टेलिग्राफ, द टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई मिरर, नेटस्क्राइब्स, टाटा ग्रुप, आय. सी. आय. सी. आय. आणि एन. वाय. यू. सारख्या संस्थांसोबत काम केले आहे. सलोनी यांनी मुंबई विद्यापीठातून साहित्यात पदव्युत्तर पदवी आणि न्यूयॉर्क विद्यापीठातून सर्जनशील लेखनात एम. एफ. ए. केले आहे.