January 13, 2026
शेती मध्ये यंत्रांच्या वापरामुळे उत्तर प्रदेशात, मुसहर समुदायाच्या उपजीविकेला धोका
शेतीमध्ये यंत्रांचा वापर होत असल्याने मुसहर समुदायासारख्या दुर्लक्षित आणि भूमिहीन गटांच्या, उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे.
चिंता देवी ह्या उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील दोघरा गावातील (मुसहर बस्ती) रहिवासी आहेत. त्या बऱ्याच काळापासून शेती आणि संबंधित कामात गुंतलेल्या आहेत. चिंता त्यांच्या समुदायातील सामाजिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर ऍक्शन एड आणि मुसहर मंचसोबत काम करत आहेत.