आंबेडकरी स्त्रीवादी कार्यकर्त्या, प्रशिक्षिका, लेखिका आणि विकास क्षेत्रातील व्यावसायिक दिव्या कंदुकुरी या द ब्लू डॉन या मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक आहेत. या संस्थेच्या कामकाजातही जातविरोधी आणि स्त्रीवादी राजकारण यांचा ठामपणे वापर केला जातो. पूर्वी दिव्या यांनी झुबान बुक्स या स्त्रीवादी प्रकाशन संस्थेत, संशोधन आणि कार्यक्रम समन्वयक म्हणून काम केले आहे. त्यांनी बेबाक कलेक्टिव्ह्ज सारख्या तळागाळातील महिलांच्या चळवळींसाठीही मोठ्या प्रमाणावर काम केले असून, भारतभरातील विविध दलित हक्क संघटनांमध्येही त्यांचे योगदान आहे.
Articles by दिव्या कंदुकुरी